मुंबई, दि. २१ : फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत युवेस पेरीन यांनी आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी दोन्ही देशातील निवडणूक पद्धती, सभागृहांची संरचना अशा विविधविषयांवर चर्चा झाली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संरचनेची श्री. पेरीन यांनीयावेळी माहिती घेतली.
विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सभापतींचे सचिव म. मु. काज आदीयावेळी उपस्थित होते.
०००००

No comments:
Post a Comment