मुंबई,दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या विषयावर सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू यांची मुलाखत
आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. दि. ११ आणि १२ सप्टेंबर
२०१७ रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत ही मुलाखत
प्रसारित होणार आहे. पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी, या योजनेंतर्गत कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ
देण्यासाठी शेतकरी कुटुंब हा निकष विचारात घेण्यात आला आहे. या योजनेसंदर्भातील
शासन निर्णयाची संपूर्ण माहिती तसेच या कर्जमाफीचे निकष काय आदी विषयांची सविस्तर
माहिती श्री. संधू यांनी दिलखुलास या कार्यक्रमात दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment