
मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात ‘वस्तू व सेवाकर ’ या विषयावर राज्याचे वस्तू व सेवाकर आयुक्त राजीव जलोटा यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर आणि शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
वस्तू व सेवाकरामधील करपालन, नवीन नोंदणी करणा-या व्यावसायिकांनी करभरणा कसा करावा आदी बाबतची माहिती श्री. जलोटा यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment