या चाळीची पाहणी
केल्यानंतर येथील रहिवाशांसमवेत झालेल्या बैठकीत श्री.वायकर म्हणाले, रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना 400 चौ.फुटाचे घर देण्यात येईल. इमारतीचे
बांधकाम 2 ते 3 वर्षात पूर्ण करण्यात येईल. चाळीची पुनर्बांधणी करताना रहिवाशांना
याच ठिकाणी संक्रमण शिबीरात जागा देण्यात येईल. वारसा हक्क संदर्भात नाते संबंधाची
योग्य ती कागदपत्रे तपासून हक्क देण्यात येईल. येथील रहिवाशांची नोंदणी
बायोमॅट्रिक पद्धतीने करण्यात येईल, असे सांगून रहिवाशांनी
सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार श्री.चौधरी यावेळी
म्हणाले, येथील रहिवाशांची समस्या गंभीर आहे.
त्यामुळे या चाळीच्या पुनर्वसनाचे काम तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे. येथील
रहिवाशांना जवळच संक्रमण शिबीर उपलब्ध करुन दिल्यास ते जागा रिकामी करण्यात तयार
होतील.
००००

No comments:
Post a Comment