मुंबई, दि. 24 :महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 14 प्रकारच्या
शौर्यपदक/सेवापदक धारकांना शासकीय अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते.
रत्नागिरीच्या 16423 एस एअर मार्शल
हेमंत नारायण भागवत यांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारीअनुज्ञेय रक्कम
मंजूर करण्यात आली आहे.
16423 एस एअर मार्शल
हेमंत नारायण भागवत यांना राष्ट्रपती सचिवालयामार्फत अती विशिष्ट सेवा
पदक प्रदान करण्यात आले आहे. 16423
एस एअर मार्शल हेमंत नारायण भागवत यांना एकूण 94 हजार रुपये इतके अनुदान
देण्यात येणार आहे. यापैकी महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत अनुज्ञेय
ठरविलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम म्हणजे 70
हजार500 रुपये शासकीय अनुदानातून आणि 25 टक्के रक्कम म्हणजे
23 हजार500 रुपये मुख्यमंत्री
सहायता (कारगिल) निधीतून देण्यात
येणार आहेत. ही रक्कम रत्नागिरीच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात
येईल.
हा शासन निर्णय महाराष्ट्र
शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201708221247588407 असा आहे.
No comments:
Post a Comment