Monday, 18 September 2017

लेप्टनंट जनरल अशोक शंकर आंब्रे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई, दि. 24 :महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक/सेवापदक धारकांना शासकीय अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते. रत्नागिरीच्या  आयसी 38708 लेप्टनंट जनरल अशोक शंकर आंब्रे यांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
आयसी 38708 लेप्टनंट जनरल अशोक शंकर आंब्रे यांना राष्ट्रपती सचिवालयामार्फत अती विशिष्ठ सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. अति विशिष्ठ सेवा पदक मिळविणाऱ्यांना 94 हजार रुपये अनुज्ञेय रक्कम मंजूर आहे. यापैकी लेप्टनंट जनरल अशोक शंकर आंब्रे यांना 85 हजाररुपये देण्यात आले असून उर्वरित 9 हजार रुपये रक्कम रत्नागिरीच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेता201708221239075507 असा आहे.

No comments:

Post a Comment