Monday, 25 September 2017

साहित्य,पत्रकारितेमधील उत्तुंग व्यक्तिमत्त्व गमावले -संभाजी पाटील-निलंगेकर


मुंबई25- साहित्य आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांवर आगळीवेगळी मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांच्या निधनाने साहित्य,पत्रकारिता क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व गमावले आहेअशा शब्दांत कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
शोकसंदेशात श्री. पाटील- निलंगेकर म्हणतातपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा अरुण साधू यांनी उमटवला. ते पत्रकार असल्याने जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास लोकांना समजेल अशा अत्यंत साध्या-सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यात डॉ. साधू यांचे मोलाचे योगदान आहे. 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलेल्या डॉ. साधू यांनी कथा-कादंबऱ्यांबरोबरच नाटक,ललित लेखन आणि समकालीन इतिहास जगासमोर मांडला. त्यांनी लिहिलेल्या  सिंहासन’, ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवर आलेले चित्रपटही प्रचंड लोकप्रिय ठरले.
30 हून अधिक वर्षे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. साधू यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहेअसेही शेवटी श्री. पाटील- निलंगेकर यांनी म्हटले आहे.
000

No comments:

Post a Comment