मुंबई, दि. 14: विधिमंडळात कायदे करत असताना संविधानाच्या चौकटीत बसविण्याबरोबरच त्यामध्ये जनतेच्या आकांक्षाचे प्रतिबिंब पडायला हवे. त्या दृष्टिकोनातून कायद्याचा मसुदा करायला हवा, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विविध राज्यातून आलेल्या विधी अधिकाऱ्यांबरोबर बोलताना केले.
केंद्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या वतीने प्रशिक्षणार्थी विधी अधिकाऱ्यांनी आज राज्याच्या विधिमंडळास भेट दिली. त्यावेळी सभापती श्री. नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी केंद्राच्या विधी व न्याय मंत्रालयाचे सह सचिव के. आर. साजी कुमार, सहायक विधी सल्लागार संजीवकुमार श्रीवास्तव, राज्याच्या विधी विभागाचे सहसचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.
श्री. नाईक निंबाळकर म्हणाले कायद्याचा मसुदा तयार करत असताना जनतेला समोर ठेवण्यात यावा. जेणेकरून खऱ्या अर्थाने या कायद्याचा फायदा जनतेसाठी होईल. प्रशिक्षणार्थी विधी अधिकाऱ्यांनी या गोष्टीचे भान ठेवावे.
देशभरातील 10 राज्यातील 21 विधी अधिकारी या दौऱ्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांनी आज विधिमंडळाच्या कामकाजाची व रचनेची माहिती घेतली.
००००
No comments:
Post a Comment