Monday, 11 September 2017

माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

15 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्विकारणार

            नागपूर, दि.11 :   माजी सैनिकांच्या पाल्यांनी 2016-17 या वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तसेच आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळविलेल्या पाल्यांना सैनिक कल्याण विभागातर्फे विशेष गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात येणार आहे. या विशेष पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे यांनी केले आहे.
            माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या माजी सैनिक अथवा सैनिक विधवा यांचे पाल्यांना दहा हजार रुपये, तसेच आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत संस्थामध्ये प्रवेश मिळविलेल्या पाल्यांना 25 हजार रुपयाचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. माजी सैनिक, सैनिक विधवांचे पाल्य केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली येथूऩ उत्तीर्ण झालेले आहेत, अशा पाल्यांचे संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment