राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौरा कार्यक्रमाचा आढावा
नागपूर, दि.11 : राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या संभाव्य नागपूर तसेच कामठी येथे ड्रगन पॅलेस परिसरातील विपशना मेडिटेशन केंद्राच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी विविध शासकीय यंत्रणांतर्फे करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.
कामठी येथील ड्रगन पॅलेस येथे राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौरा संदर्भातील व्यवस्था आढावा बैठकीस केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या माजी राज्यमंत्री ॲड. सुलेशाताई कुंभारे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, अपर पोलीस आयुक्त शामराव दिगावकर, पोलीस उपआयुक्त रामसिंग परदेशी, निलेश भरणे, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता आर.जी. शेख, सामाजिक न्याय विभागाचे डॉ. सिध्दार्थ गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कातडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या संभाव्य दौऱ्यानुसार ड्रगन पॅलेस परिसरातील मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन करणार असून या अनुषंगाने करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात आढावा घेतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रपती यांच्या आगमनापासून तर प्रयाणापर्यंत करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या नियोजनानुसार हेलीपॅड, रस्त्याची सुधारणा, कार्यक्रमस्थळी करावयाच्या आवश्यक सुविधा या संदर्भात आढावा घेवून विविध विभागाने सोपविलेली कामे तात्काळ पूर्ण करावी, अशा सूचना विभाग प्रमुखांना यावेळी दिल्यात.
प्रारंभी ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी मेडिटेशन सेंटर तसेच राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत यावेळी माहिती दिली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी राष्ट्रपती यांच्या संभाव्य दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेसंदर्भात यावेळी माहिती देतांना रस्ते, वीज, तसेच पाण्याच्या संदर्भात विभागा प्रमुखांनी अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावी अशा सूचना दिल्या. पोलीस विभागातर्फे व्यवस्थेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
00000000


No comments:
Post a Comment