मुंबई, दि. 7 : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेली पाणीपुरवठा योजनांच्या कामासाठी 34 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून संबंधित प्रशासनाकडे त्याचे वितरण करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत चालू असलेल्या योजनांना तातडीने निधी उपलब्ध करण्याबाबत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आढावा घेतला होता. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या 555 भौतिकदृष्ट्या पूर्ण परंतु आर्थिकदृष्ट्या अपूर्ण योजनांना पूर्ण करण्यासाठी तसेच हे अनुदान प्राथम्याने फ्लोराईड/आर्सेनिकग्रस्त गावे/वाड्यांतील येाजना, संसद आदर्श ग्राम योजनेमधील गावातील योजना, हागणदारीमुक्त गावातील योजना पूर्ण करण्यासाठी प्राथम्याने खर्च करण्यात येणार आहे.
हा निधी राज्यातील विविध जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडील योजनांना मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी हा पाणी गुणवत्ता व सनियंत्रण यासाठी उपलब्ध करुन दिलेला आहे. सुमारे 11 कोटी एवढा केंद्रीय निधी सहाय्यिकृत बाबींसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. उपरोक्त निधी उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या 555 योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, असा आशावाद श्री. लोणीकर यांनी व्यक्त केला आहे.
००००
No comments:
Post a Comment