Thursday, 7 December 2017

नागरी संरक्षण दलात 19 व 20 डिसेंबर रोजी स्वयंसेवक नोंदणी


मुंबई, दि. 7 : नागरी संरक्षण दलाच्या पुणे, नाशिक, उरण, तारापूरठाणे व बृहन्मुंबई कार्यालयात  स्वयंसेवक  निवडण्यात येणार आहेत. यासाठी दि. 19 आणि 20 डिसेंबर 2017 रोजी, नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय आवारक्रॉस मैदानधोबी तलावमुंबई  येथे सकाळी 7.30 ते 5.00 या वेळेत नोंदणी प्रक्रिया स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करता येणार आहे.
        नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्याचे वय  18 वर्षे व किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून उमेदवारांचा  पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल असणे आवश्यक आहे. स्वयंसेवक नोंदणीकरिता वयाचा दाखलाशैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्रआधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
स्वयंसेवकांना मैदानी परीक्षा द्यावी लागणार असून, धावणे चाचणीकरिता पुरुषांनी 1600 मीटर 6 मिनिटे 30 सेंकदात तर महिलांनी 800 मीटर (3 मिनिटे 20 सेंकदात पुर्ण करणे आणि गोळाफेक पुरुषांनी 4.90 मीटर,तर महिलांनी 4.50 मीटर गोळाफेक पूर्ण करावयाचे आहे.) अधिक माहितीकरिता अतिरिक्त नियंत्रकनागरी संरक्षणबृहन्मुंबई येथे 022-22013411 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी नोंदणी करावी असे आवाहन उपसंचालकनागरी संरक्षण यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment