Thursday, 7 December 2017

'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर


 मुंबईदि. 7 : - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र कार्यक्रमात वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन, दुग्धविकास,मत्‍स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दुरदर्शच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवारदि. 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे.ही मुलाखत निवेदक हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.
उत्कृष्ट दुग्धोत्पादन देणा-या गोवंशीय व म्हैसवर्गीय पशुंचे संवर्धनकुक्कुटपालन तसेच अंडीउत्पादन वाढावे यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्याकरिता राबविण्यात येणाऱ्या  योजनानीलक्रांती धोरण, मत्स्यसंवर्धनासाठी  शासन करीत असलेले प्रयत्न व राज्यात वस्त्रोद्योग वाढीसाठी देण्यात येणाऱ्या चालनावस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगार संधी,याबरोबरच आगामी काळातील वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्‍स्यव्यवसाय विभागाच्या सविस्तर वाटचालीच्या संदर्भात सविस्तर माहिती श्री. खोतकर यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.
०००००

No comments:

Post a Comment