Thursday, 21 December 2017

अतुलराज कलीता यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी 30 जानेवारी रोजी

मुंबई, दि. 21 : तळोजा कारागृहातील न्यायबंदी अतुलराज कलीता यांचा पोलीसांच्या रखवालीत मृत्यु झाला. या घटनेची दंडाधिकारी चौकशी मंगळवार दि. 30.01.2018 रोजी दुपारी 02.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,निवडणूक शाखा,तीसरा मजला,जुने जकात घरशहिद भगतसिंग मार्ग,फोर्टमुंबई येथे होणार आहे.
ज्यांना या चौकशी संबंधाने म्हणणे मांडावयाचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारीमुंबई शहर यांचे समोर चौकशीच्या वेळी सादर करावीत.
००००

No comments:

Post a Comment