मुंबई,दि.21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची 'पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची वाटचाल' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.
ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 22 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 वाजता प्रसारित होईल. ही मुलाखत मनाली दिक्षित यांनी घेतली आहे.
या मुलाखतीत राज्यातील गाव टंचाईमुक्त व्हावीत यासाठी राज्य शासनाने घेतलेले निर्णय, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची व्याप्ती, स्वच्छता दिंडी उपक्रम, स्वच्छता विभागामार्फत करण्यात येत असलेली जनजागृती आणि स्वच्छ अभियानाला मिळत असलेली गती, राज्यात वॉटरग्रीड नेमकी योजना काय आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम तसेच विभागाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती श्री. लोणीकर यांनी'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment