Tuesday, 12 December 2017

गडचिरोली जिल्हयात योजनेच्या ग्रीनलिस्टमध्ये 35403 लाभार्थी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
                          
          गडचिरोली,दि: 12: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान अर्थात राज्यातील ऐतिहासीक कर्जमाफी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्हयात " ग्रीन लिस्ट " मध्ये एकूण 35 हजार 403 शेतकऱ्यांचा समावेश आहेृ  या सर्वांना कर्जमाफी, तसेच एकरकमी परतफेड आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान या पध्दतीतून लाभ मिळणार आहे
          " ग्रीन लिस्ट "अर्थात कर्जांच्या निकषांची पुर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हा लाभ प्रदान करण्यात येत आहे. या एकूण पात्र 35 हजार 403 शेतकऱ्यांपैकी नियमित कर्ज फेड करणाऱ्या 15 हजार 456 शेतकरी खात्यांचा समावेश आहेृ
          गडचिरोली जिल्हयात 994 शेतकरी एकरकमी परतफेड आणि 18,953 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेले आहेतृ  यांची एकूण संख्या 19 हजार 947 इतकी आहे.
          शासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यातून 77 लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते.  यात नावाची झालेली पुनरुक्ती वगळून एकूण 69 लाख शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले.  त्या सर्वांचा समावेश " ग्रीन लिस्ट " मध्ये करण्यात आला होता.
          गडचिरोली जिल्हयात या संदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी  ए.एस.आर. नायक यांनी दैनंदिन स्वरुपात या कर्जमाफी योजनेचा आढावा घेतला, त्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम मिळण्याच्या कामास गती मिळाली.

          पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते दिवाळीच्या दिवशी पहिल्या काही लाभार्थ्यांना प्रतिकात्मक लाभ देवून याची सुरुवात करण्यात आली. 
          कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांचे दिड लाखांपर्यंतचे कर्ज यात माफ करण्यात आले आहे.  त्यापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांना दीड लाखावरील रक्कम भरल्यानंतर लाभ देवून एक रकमी परतफेडीचा लाभ यात मिळाला. 
          काही शेतकरी कर्ज घेतल्यावर नियमित परतफेड करतात.  त्यांची झालेली नुकसान भरुन निघावे यासाठी प्रथमच 25 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देखील या ऐतिहासिक योजनेत प्रथमच देण्यात आला.
                                                बोलक्या प्रतिक्रिया
          या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शासनाने शेतकऱ्यांना खूप मोठी मदत केली, याचे मला खूप समाधान आहे.  आता सातबारा कोरा झाल्यामुळे आता पुन्हा कर्ज घेऊ शकतो अशी बोलकी प्रतिक्रिया गडचिरोली तालुक्यातील माडेमुल गावच्या महिला शेतकरी रेखा देवदास धुर्वा यांनी याबाबत बोलताना व्यक्त केली.
          याच स्वरुपाच्या प्रतिक्रिया चांदाळा गावातील शेतकरी रुषी चौधरी किरंगे तसेच लिलाबाई कोवे यांनीही दिल्या आहेतृ

                                                            *******

No comments:

Post a Comment