Monday, 4 December 2017

'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य' 'जय महाराष्ट्र’मध्ये ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे


मुंबई, दि.4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांची 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 5 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पल्लवी मुजूमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून. भारतीय संविधानाचे शिल्पकार, एक थोर समाजसुधारक, आर्थिक धोरणाचे धुरीण, एक व्यासंगी पत्रकार, कामगारांच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये, शेतक-यांच्या प्रश्नासाठी जागरूक ज्ञानपुरूष व समताप्रेमी, निस्सीम ग्रंथप्रेमी असे भारतरत्न डॉ.बाबासाहेंब आंबेडकर यांच्या प्रत्येक क्षेत्रातील कार्याची  सविस्तर माहिती  ज्येष्‍ठ साहित्यिक पतंगे यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

००००

No comments:

Post a Comment