नागपूर, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार ना. गो. गाणार, डॉ. मिलिंद माने यांनी विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण, सहसचिव अशोक मोहिते, उपसचिव शिवदर्शन साठ्ये, माहिती व जनसंपर्क संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, अवर सचिव सुनील झोरे, एन. आर. थिटे, रविंद्र जगदाळे, सुभाष नलावडे, विजय कोमटवार, रंगनाथ खैरे, जे. बी. राणे, ग्रंथपाल बाबा वाघमारे यांनीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
****

No comments:
Post a Comment