राज्यात शासकीय प्रकल्पांच्या बांधकामांकरिता लागणाऱ्या वाळू, मुरुम यासाठीचे लिलाव पट्टे राखीव ठेवण्यात येतील. त्यानंतर अन्य पट्टयांचा लिलाव केला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य सुनिल केदार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले की, नागपूर जिल्ह्यात गौण खनिजाच्या स्वामित्त धनापोटी एप्रिल ते 15 डिसेंबर, 2017 पर्यंत 64.77 कोटी रुपये तसेच गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीच्या 590 प्रकरणात एक कोटी 15 लाख दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. शासकीय कामांसाठी गौण खनिजांना प्राधान्य देण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात तात्पूरते 24 परवाने जे देण्यात आले आहेत त्याबाबत विभागीय आयुक्तांमार्फत आठ दिवसात चौकशी केली जाईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.
00

No comments:
Post a Comment