Thursday, 21 December 2017

मालाड पूर्व परिसरात महापालिकेमार्फत डायलिसिस केंद्रासाठी निधी उपलब्ध करुन देणार - डॉ. रणजित पाटील

            मालाड पूर्व परिसरात मुंबई महापालिकेच्या पाच दवाखान्यांमार्फत आरोग्य सेवा पुरविल्या जाते. या भागात चार डायलिसिस केंद्र असून महापालिकेमार्फत डायलिसिस सुविधा सुरु करण्यासाठी दोन महिन्यात निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
            सदस्य सुनिल प्रभू यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, मालाड दिंडोशी परिसरात खासगी संस्थांमार्फत तीन डायलिसिस केंद्र व म.वा.देसाई महापालिका रुग्णालयामार्फत एक असे एकूण चार डायलिसिस केंद्र सुरु आहेत. तथापी मालाड पूर्व विभागात महापालिकेमार्फत डायलिसिसकरिता सुविधा उपलब्ध नाही. त्यासाठी दोन महिन्यांमध्ये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य योगेश सागर यांनी भाग घेतला.
00

No comments:

Post a Comment