नागपूर, दि. 21 : काटोल (जि. नागपूर) नगरपरिषदेने खेळाच्या मैदानाचे आरक्षण नियमबाह्यरित्या बदलून त्याचे निवास उपयोगी क्षेत्रात रुपांतर करुन घरकुलांचे बांधकाम केल्या प्रकरणात विभागीय आयुक्तांकडून चौकशी केली जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात सभागृहाच्या उपसभापतींनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी असे निर्देश दिले.
या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुडे, सदस्य सर्वश्री सुनील तटकरे, गोपीकिसन बाजोरिया यांनी सहभाग घेतला.
००००

No comments:
Post a Comment