Thursday, 21 December 2017

मुलींची स्वच्छतागृहे उभारण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातून निधी - शिक्षणमंत्री विनोद तावडे

नागपूरदि. 21 : राज्यातील मुलींची स्वच्छतागृहे नसलेल्या सुमारे दीड टक्के प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृहे उभारण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातून निधी देऊन स्वच्छतागृहे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलअसे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
            सदस्य रामहरी रुपनवर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कीराज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहाचे प्रमाण 98.57 टक्केयवतमाळमधील शाळांमध्ये 98.25 टक्केमुलांच्या स्वच्छतागृहांचे प्रमाण राज्यात 97.85 टक्के तर यवतमाळमध्ये 97 टक्केपिण्याच्या पाण्याची सुविधा 99.48 टक्केयवतमाळमध्ये 99.34 टक्केखेळाचे मैदान यवतमाळमध्ये 90 टक्के तर राज्यात 82 टक्केस्वयंपाकगृहाची व्यवस्था राज्यातील 95 टक्के शाळात तर यवतमाळमधील 97 टक्के शाळांमध्ये आहे.
            राज्यातील काही ठिकाणी काही दिवसांसाठी पाण्याअभावी स्वच्छतागृहे बंद असली तरी उर्वरित बहुतांश कालावधीसाठी सुरु असतात. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्यानुसार केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. शाळांमधील शौचालये बांधण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत थेट प्रधानमंत्री कार्यालयाकडून केला जातो. त्यामुळे स्वच्छतागृहांचे काम गतीने व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
            सर्वसमावेशीत शिक्षणाच्या उद्देशानेच शिक्षण हक्क कायद्यानुसार एका वर्गामध्ये एकत्रपणे दोन-तीन तुकड्या बसविल्या जातातअसेही त्यांनी सांगितले.
            या लक्षवेधीवरील चर्चेत सर्वश्री सुनील तटकरेडॉ. सुधीर तांबेश्रीमती हुस्नबानू खलिफेडॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.
००००

No comments:

Post a Comment