मुंबई, दि.6 : महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, 2011 मध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री
विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वेगवेगळया शैक्षणिक
संस्थामध्ये शैक्षणिक फी एकसमान असावीयासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येत
आहे. तसेच शैक्षणिक शुल्क सुधारणेचे प्रारुप तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश
व्ही.जी. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने
राज्य शासनास यासंदर्भातला अहवाल आज दिला. याबाबतचा बालभवन
येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
श्री. तावडे यावेळी म्हणाले, शुल्क वाढीबाबत या समितीने पालकांकडून आणि संस्थांकडून
आलेली सर्व निवेदने स्वीकारली आणि या निवेदनांचा अभ्यास केला. याचबरोबर समितीने
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, 2011
अधिनियमाचाही पूर्ण अभ्यास केला. समितीने दिलेल्या अभ्यासानुसार पालकांना आणि
संस्थेलाही शुल्क वाढीबाबत समितीकडे अर्ज करण्याची संधी आहे. समितीने सुचविलेल्या
सुधारणेनुसार पालकांना शुल्क नियंत्रण समितीकडे अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना
चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्थांना दरवर्षी 7.5 टक्क्यांपर्यंत शुल्क वाढविता येते, त्यामुळे शिक्षण संस्थानाही या सुधारणेचा फायदा मिळणार आहे.
सदर समितीने दिलेल्या अहवालानुसार पालक शिक्षक संघटनेमध्येही पालकांचे
प्रतिनिधीत्व एका सदस्यावरुन दोन करण्यात आले आहे.
सदर समितीने शुल्क विनियमन
संदर्भातील काम 6 मे 2017
रोजी सुरु केले.
समितीच्या 10 बेठका झाल्या. समितीने दिलेल्या अहवालाचा अभ्यास
करुन मार्च 2018 पूर्वी अधिनियमामध्ये बदल करण्यात
येईल असेही श्री. तावडे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
रोबोमेट
प्लस ॲपचे उदघाटन
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने
तयार केलेल्या "रोबोमेट प्लस" या मोबाईल अॅपमुळे (संगणकीय प्रणाली)
दहावीच्या विद्यार्थ्यांना आता अभ्यास करणे सोपे होणार आहे. हे मोबाईल अॅप
दहावीच्या विद्यार्थ्यांना
मोफत डाऊनलोड करता येणार असून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी हा उत्तम ई
मार्ग उपलब्ध झाला आहे. तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली
शिकविलेले सर्व विषयांचे व्हिडिओ सोप्या भाषेत या अॅपमध्ये उपलब्ध असणार आहेत.
मराठी माध्यमाच्या विदयार्थ्यांसाठी हे ॲप उपयुक्त ठरेल असा विश्वास श्री. तावडे
यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी यावेळी
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्रेणीक कोटेचा उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेस निवृत्त
न्यायाधीश व्ही.जी.पळशीकर यांच्यसह कृष्णप्रसाद वॉरीअर, मोहन
आवटे, शिक्षण संचालक सुनील चव्हाण, शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव स्वाती नानल, उपसंचालक बी.बी.चव्हाण, विधी
व न्याय विभागाचे अविनाश बनकर उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment