Wednesday, 6 December 2017

जालना जिल्ह्यातील पालखी महामार्गाचे काम दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करावे - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर


            मुंबई, दि. 6 :जालना जिल्ह्यातील लोणार - मंठा व वाटूर - लोणी (शेगाव ते पंढरपूर) पालखी मार्ग या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना ‍जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.
            या पालखी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत श्री.लोणीकर  बोलत होते. या बैठकीस राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, परतुरचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदी मान्यवर उपस्थित होते.
            श्री.लोणीकर पुढे म्हणाले की, जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने मान्यता दिली. या महामार्गामार्फत विदर्भ, मराठवाडा मार्गे पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणार आहे. या महामार्गावर विकासाचा चालना मिळणार असून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनाही सोयीचा ठरणार आहे. हा महामार्ग चौपदरी करण्यासाठी अधिक प्रमाणात जमीन संपादीत करावी लागली असती. परंतु हा महामार्ग तीन पदरी करण्याचे नियोजन केल्याने कमीत कमी जमीन संपादीत करावी लागत आहे. या महामार्गासाठी एकूण 26हेक्टर जमीन लागत आहे. लागणारी जमीन व गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. मंठा तालुक्यातील वडगाव सरहाद 0.0980,तळणी 0.5552, सरकारी जमीन 0.1607,कानडी 0.1065, लिंबाखेडा 0.4561, दहीफळ खंदारे 0.8316, सावरगाव 1.5645, तळेगाव 0.6531, नायगाव प्र.बामणी 2.3100, पिंपरखेडा खराबे 0.2797, ठोकसाळ 1.8893, जाटखेडा 0.3824, सरकारी जमीन 0.2959, सासरखेडा 0.04280 सरकारी जमीन 0.00560अशा 13 गावातील 75 जमीन मालकांची जमीन तसेच सरकारी जमीन संपादीत करावी लागत आहे.
            परतूर तालुक्यातील गावे, जमीन हेलोणीखुर्द6.2857, श्रीष्टीताडा 1.0669, श्रीष्टी 1.2264, सिंगोना 2.0368, साविंगी गंगाकिणारा 2.2220 सरकारी जमीन 0.6858, लांडकदरा 0.0548, आष्टी 0.1049, परतवाडी 0.1169, देठणाखुर्द 0.0062, परतूर 0.06287, रोहिणा बु.1.9651 सरकारी जमीन 0.20842, एकरुखा 0.35958, रोहिणा खुर्द 0.5261, कणकवाडी 0.579, पिंपरखेडा 01957 अशा 15 गावातील 137 जमीन तसेच सरकारी जमीन मालकांची जमीन संपादीत करावी लागत आहे. या दोन्ही तालुक्यातील बहुतेक जमीन मालकांची जमीन संपादीत करण्यासाठी सहमती आहे. काही जमीन मालकांच्या जमीन संपादीत करण्यास तक्रारी असल्यास त्या चर्चा करुन सोडवाव्यात व या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना श्री.लोणीकर यांनी यावेळी दिल्या.

000

No comments:

Post a Comment