Wednesday, 20 December 2017

मृत कामगारांच्या वारसास प्रत्येकी चार लाखांची मदत - कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर


नागपूरदि. 20 - बीड जिल्ह्यातील  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील मृत कामगारांच्या वारसास प्रथम टप्प्यात प्रत्येकी चार लाख रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात आली असल्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
            विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम 93 अन्वये उपस्थित केलेल्या सुचनेवर श्री. निलंगेकर यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली.  मृत कामगारांच्या वारसास कायमस्वरूपी नोकरी देण्याचे लेखी कळविण्यात आले असून सर्व जखमी कामगारांचा दवाखान्याचा खर्च कारखाना व्यवस्थापन करीत असल्याचे श्री. पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितले.
००००

No comments:

Post a Comment