Wednesday, 20 December 2017

रुग्णसेवा देण्याच्या संदर्भात शासन सर्वसामान्यांच्या पाठीशी - वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण


नागपूरदि. 20 :  वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये रुग्णालयपरत्वे पुरविल्या जाणा-या एकूण 178 नवीन रुग्णसेवेसाठी शुल्क निश्चिती करण्यात आलेली आहे. तर 45 रुग्णसेवांच्या शुल्कामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून शासन रुग्णसेवा देण्याच्या संदर्भात सर्वसामान्यांच्या पाठीशी असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
सदस्य संजय दत्त यांनी नियम 93 अन्वये उपस्थित केलेल्या सुचनेवर श्री. चव्हाण यांनी सांगितले कीमोफत वैद्यकीय सेवेसाठी निश्चित केलेल्या लाभार्थींच्या यादीमध्ये अंत्योदय अन्न योजना,अन्नपूर्णा योजना लाभार्थीआत्महत्या केलेल्या शेतक-यांचे कुटुंबअनाथ मुलेदुर्धर आजारग्रस्त रुग्णपरित्यक्ता इत्यादी नवीन लाभार्थींचा समावेश करण्यात आला आहे. 
००००

No comments:

Post a Comment