नागपूर, दि. 20 : महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय घेतला असून लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जयवंतराव जाधव यांनी नियम 93 अन्वये उपस्थित केलेल्या सुचनेवर श्री. पाटील यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली. या प्रकल्पासाठी आवश्यक विविध विभागांचे एकूण 12 ना हरकत दाखले प्राप्त करण्यात आलेले आहेत. प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही 15.96 हेक्टर इतकी असून ती राजभवनापासून 1.2 किमी, गिरगाव चैापाटीपासून 3.6 कि.मी. व नरिमन पॅाईंटपासून 2.6 किमी. अंतरावर आहे. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास शासनाने 28 फेब्रुवारी 2014 च्या निर्णयान्वये मान्यता दिलेली असल्याचे श्री. पाटील यांनी शेवटी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment