Thursday, 21 December 2017

महसूल मिळवून देणारा फेस्टिवल म्हणून याकडे पाहिलं जाईल - जयकुमार रावल

Ø  महाराष्ट्र फूड फेस्टिव्हलचे थाटात उदघाटन
Ø  बोदलकसा पर्यटन स्थळांचे लोकार्पण
Ø  वणी खाण पर्यटन,विदर्भ कस्टमाईज टूर पॅकेजचे विमोचन
Ø  विविध खाद्यपदार्थांचे 50 स्टॉल्स
Ø  बोदलकसा पर्यंटनासाठी 20 टक्के सूट
नागपूर, दि. 21 :  पर्यटनातल महत्वाचं अंग म्हणून खाद्यपदार्थांकडे पाहिलं जातं.  महाराष्ट्रातल्या तमाम खाद्यसंस्कृतीला एका छताखाली आणण्याचा काम या फूड फेस्टिवल च्या माध्यमातून होत आहे. फूड फेस्टिवल दरवर्षी आयोजित केला तर त्याच ब्रँडिंग होईल आणि लवकरच महसूल मिळवून देणारा एक मोठा फेस्टिवल म्हणून याकडे पाहिलं जाईल,  असे प्रतिपादन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि लोकमाता सुमतीताई सुकळीकर प्रतिष्ठान यांच्या सयूंक्त विद्यमाने ऑरेंज सिटी फेस्ट अंतर्गत महाराष्ट्र फूड फेस्टिवलचे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतीक केंद्र येथे करण्यात आले. 6 दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलचे उदघाटन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार,  आमदार शिरीष चौधरी, पर्यटन प्रधान सचिव नितीन गद्रे, सुमतीताई स्मृती प्रतिष्ठान च्या मार्गदर्शक कुंदाताई विजयकर, छाया गाडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय बोधनकर, सचिव जोत्स्ना पंडीत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक स्वाती काळे, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.
            पुढे बोलताना श्री रावल म्हणाले, हिवाळी अधिवेशनाच नाव घेताच नागपूरच्या फूड फेस्टिव्हलचीही आठवण होईल अशा पद्धतीचे समीकरण तयार झाले पाहिजे. पर्यटनाला नवा आयाम आणि संकल्पना देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मागास भागात पर्यटनाच्या माध्यमातुन अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम करण्यात येत आहे. नंदुरबारसारख्या मागास जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय अश्व महोत्सव आयोजित करून तिथल्या आदिवासी संस्कृतीची ओळख जगाला करून दिली.यामुळे तेथील अर्थव्यस्थेलाही चालना मिळाली असे श्री रावल यांनी सांगितले.
            महाराष्ट्रात पर्यटनाला पोषक अशी सर्व प्रकारची पर्यटन स्थळ आहेत. जंगल, समुद्र, किल्ले, ऐतिहासिक शिल्प, आणि त्याच्या जोडीला  खाद्यपदार्थातील विविधताही आहे. विदर्भातील वाघ बघायला परदेशातून पर्यटक येतात इतकी वाघांची मोहिनी आहे असेही ते यावेळी म्हणाले. वाघाची राजधानी असलेल्या नागपूर मधील 'झिरो माईल्स' ला सुध्दा सेल्फी पॉईंट म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निधी मंजूर केला आहे.  यावेळी बोदलकसा पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी इथे नोंदणी करणाऱया पर्यटकांना  20 टक्के सवलतही त्यांनी जाहीर केली.
            याप्रसंगी बोलताना मदन येरावार म्हणाले, पर्यटन हे क्षेत्र महसूल सोबतच रोजगारही देत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मितीसाठी पर्यटनाची वेगवेगळी क्षेत्रे आणि स्थळ विकसित करण्यात येत आहेत. माईन टुरिझम हा त्याचाच एक भाग आहे. पूर्वी एम टी डी सी चे विश्रामगृह हे कुणालातरी चालवायला दिले जात होते. आता एम टी डी सी ते स्वत:च चालवत आहे. भविष्यात एम टी डी सी  च्या  रेस्ट हाऊसला  पर्यटकांच पाहिलं प्राधान्य असेल यापद्धतीने ते विकसित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्तम आतिथ्य, रुचकर जेवण आणि सुंदर निवास त्याठीकाणी असणार आहे. नागपूरचे  फूड फेस्टिवल हे सुद्धा एक रोल मॉडेल ठरावे असे आयोजन याठिकाणी करण्यात आल्याबद्दल त्यांनी आयोनकांचे अभिनंदन केले.
            महापौर नंदा जिचकार यांनी फूड फेस्टिवल ला अर्थव्यवस्थेशी जोडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उत्तम आचारी  तयार होण्यासाठी सुद्धा कोर्सेस सुरू केले आहे असे सांगितले.
            यावेळी मान्यवरांचे हस्ते गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा या पर्यटन स्थळाचे लोकार्पण , वणी खाण पर्यटन आणि विदर्भ कस्टमाईज टूर पॅकेजच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
यावेळी जोत्स्ना पंडीत यांनी सुमातीताई सुकळीकर यांच्या कार्याची माहिती सांगितली. त्यांच्या समाजकार्याचा वसा चालविण्यासाठी प्रतिष्ठान 7 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले. शासनाने सुमती ताईच्या कामाची दखल घेऊन महिला उद्योगिनी महिला सशक्तीकरण योजना 2016 मध्ये सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय बोधनकर यांनी केले. तर पर्यटन विभागाच्या वतीने स्वाती काळे यांनी माहिती दिली. 
            कार्यक्रमाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यावस्थापक आशुतोष राठोड, नानाभाऊ  येरावार, एल इ डी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ हर्षा जारीया, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजुसिंग रेणू, समीर पंडित, उपस्थित होते.मान्यवरांचे आभार देवेन दस्तुरे यांनी मानले


******

No comments:

Post a Comment