Wednesday, 6 December 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनात आदरांजली

मुंबई, दि.6:भारतीय राज्यघटनेचे  शिल्पकार, भारतरत्न  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवन प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, विधानपरिषद सदस्य निलम गो-हे, सचिव महेंद्र काज, सचिव राजकुमार सागर, उपसचिव राजेश मडावी आदी मान्यवरांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानभवनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही अभिवादन यावेळी केले.
००००



No comments:

Post a Comment