Thursday, 21 December 2017

राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर ॲक्टीव ट्रॅकर बसविणार नाही - आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत

राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर ॲक्टीव ट्रॅकर बसविण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन नाही, असे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
            विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य सर्वश्री अमीन पटेल, पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देतांना आरोग्य मंत्री यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाने संचालक पीसीपीएनडीटी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तज्ञांच्या समितीची नवी दिल्ली येथे बैठक झाली होती. त्यामध्ये ॲक्टीव ट्रॅकर हे लिंग निदान प्रक्रियेस आळा घालण्यास उपयुक्त नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर अशा प्रकारची यंत्रे बसविण्यात येणार नाहीत.
००००

No comments:

Post a Comment