मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात राज्यातील
बालकांच्या हक्कांचे संरक्षण या विषयावर बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे
यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता
वाहिनीवरून सोमवार दि. ८ आणि मंगळवार दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत
प्रसारित होणार आहे. जेष्ठ पत्रकार पदमभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यातील
बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण
आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, शिक्षणाचा तसेच
सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे. या सर्वांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही बाल हक्क
आयोगाची असते. याच बाल हक्क आयोगाची रचना, कार्यपद्धती, बालकांसाठी
नवनिर्मित केलेले पॉस्को, चिराग ॲप
या विषयांची माहिती श्री. घुगे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून
दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment