Monday, 8 January 2018

'जय महाराष्ट्र'मध्ये ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह

मुंबई, दि.८ :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह यांची 'ऊर्जा संवर्धन धोरण' या विषयावर  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर उद्या मंगळवार दि. ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत रुपलक्ष्मी चौगुले- शिंदे यांनी घेतली आहे.
          राज्यातील विजेची मागणी, वीज निर्मिती क्षेत्रातील गुंतवणूक, मुख्यमंत्री सैार कृषी वाहिनी योजना, केंद्र शासनाची दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, वीज ग्राहकांकरिता तयार करण्यात आलेले ॲप, सौर कृषी पंप पथदर्शी प्रकल्प, एलईडी बल्ब वितरणामध्ये महाराष्ट्राची कामगिरी, विजेची गळती रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, लोकाभिमुख सेवा देण्यासंदर्भात ऊर्जा विभागाचे सुरू असलेले प्रयत्न याबाबत सविस्तर माहिती श्री. सिंह यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहे.
००००



No comments:

Post a Comment