मुंबई, दि. 8:दरवर्षी
24 डिसेंबर
रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने राज्यभर
ग्राहक जागृतीचे उपक्रम राबविण्यात येतात. या वर्षीही राज्यात सुमारे 300
तालुक्यांमध्ये ग्राहकजागृती करण्यात आली याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मंगळवार
दि.9 जानेवारी
रोजी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात ग्राहक जागृती संदर्भातील प्रदर्शनाचे
आयोजन करण्यात येणार आहे.
या
प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी 11 वाजता अन्न व नागरी
पुरवठा विभागाचे प्रधान सचिवमहेश पाठक यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी चार
वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष
बापट यांच्या हस्ते ग्राहक चळवळीत उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात
येईल. हे प्रदर्शन सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले
राहणार आहे.
यावर्षी
केंद्र शासनाकडून इमर्जिंग डिजीटल मार्केट्स : इश्युज ॲण्ड चॅलेंजेस इन कंझ्युमर
प्रोटेक्शन (Emerging Digital Markets: issues and challenges in Consumer
Protection) ही संकल्पना ठरविण्यात आली आहे.
या प्रदर्शनात अन्नव नागरी पुरवठा विभाग, अन्न व औषध
प्रशासन, वैधमापन शास्त्र यंत्रणा, बेस्ट विभाग, पोलीस विभाग, पेट्रोल आणि
तेल संस्था, गॅस पुरवठादार, परिवहनतसेच
ग्राहकांशी संबंधित इतर संस्था यात सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातून ग्राहकांना
फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
००००
No comments:
Post a Comment