मुंबई, दि. २ : राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे आयोजन ( नॅशनल हॅण्डलूम एक्स्पो) दि. १० फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीमध्ये पुणे येथे करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन ग्राहकांसाठी दुपारी १२ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हातमागावर उत्पादित वस्तूंची रेलचेल राहणार आहे. ग्राहकांना विशेष २०% सूट देण्यात येणार आहे. एकूण १३ राज्यांमधून ७३ संस्था भाग घेणार असून ४५ हजार चौ. फूटामध्ये वेगवेगळ्या आकाराची दुकाने उभारण्यात येणार आहेत.
पुणेकरांनी या हातमाग संस्थेच्या प्रदर्शनाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा व भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक म. रा. हातमाग महामंडळ मर्या, नागपूर यांच्याकडून करण्यात आले आहे.
००००
No comments:
Post a Comment