Friday, 2 February 2018

'दिलखुलास' मध्ये अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे

मुंबईदि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात हॉर्न नॉट ओके प्लिज या विषयावर मोटार वाहन विभागाचे अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या शनिवार दि. 3 आणि सोमवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
वाढत्या ध्वनी प्रदूषणावर आळा बसविण्याकरिता हॉर्न नॉट ओके प्लिज अभियान, रस्ता अपघातापासून सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजीअवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाय योजनामद्यपी चालक आणि अवैध माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर करण्यात येणारी कारवाई तसेच सर्वसामान्य माणसांना परिवहन विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आदी विषयींची माहिती श्री. सहस्रबुद्धे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment