Saturday, 3 February 2018

हातमागावर आरक्षित वाणांचे उत्पादन अन्य मागावर झाल्यास माहिती द्यावी

मुंबई, दि.3 :हातमाग उद्योगाच्या संरक्षण व विकासाकरिता कायदेशीर तरतुदीनुसार संरक्षित अकरा वाणांचे उत्पादन यंत्रमागावर किंवा अन्य कोणत्याही मागावर कोणी करत असल्यास हातमाग कार्यालयाला माहिती दयावी, असे आवाहन उपसंचालक वस्त्रोद्योग, मुंबई यांनी केले आहे.
हातमाग (आरक्षित वाणाचे उत्पादन)कायदा1985तील तरतुदीनुसार साडी,धोतर,टॉवेल,लुंगी,बेडशीट/सतरंजी/ड्रेस मटेरियल/कंबल/शाल, लोकरी कापड,चादर ही अकरा वाण हातमागावर उत्पादन करण्यासाठी आरक्षित करण्यात आली आहेत.
या वाणाचे उत्पादन हातमागाव्यतिरीक्त इतर कोणत्याही मागावर उत्पादन करणे कायद्याने गुन्हा आहे.असे निदर्शनास आल्यास प्रादेशिक कार्यालय,हातमाग विकासआयुक्त,एन्फोसमेंट विंग,गुजरात खादी ग्रामोदयोग मंडळ कॅम्पस,जुना वडज,आश्रम रोड अहमदाबाद, टेली फॅक्स (079) 27553004 आणि 2755781 यावर संपर्क करावा तसेच rodchewadi@gmail.com यावरमेल करावा.
   त्यासोबतच प्रादेशीक उपसंचालक,वस्त्रोदयोग,मुबंई,7 वा माळा,चरई ,टेलीफोन एक्स्चेज बिल्डींग,मावळी मंडळ रोड,चरई,ठाणे (पश्चिम )rddtextilesmumbai@rediffmail.comकिंवा दुरध्वनी क्रमांक 022-25405363  यावर माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
००००

No comments:

Post a Comment