·
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामांचा आढावा
·
जिल्हयातील उत्कृष्ट नियोजनाबद्दल गौरव
·
जूनपूर्वी अपूर्ण कामे पूर्ण करा
·
जिओ टॅगिंगमध्ये 95.57 टक्के कामपूर्ण
नागपूर, दि.3 : जलयुक्त
शिवार अभियानामध्ये नागपूर जिल्हयाने राज्यात उत्कृष्ठ नियोजन करुन
जलपरिपूर्णतेसाठी केलेली कामे उत्कृष्ठ असून यावर्षी निवडण्यात आलेली 3 हजार 514
कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हयाला उपलब्ध करुन देण्यात येईल,
अशी ग्वाही राज्याचे जलसंधारण सचिव एकानाथ डवले यांनी दिली.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात नागपूर जिल्हयातील जलयुक्त शिवार अभियान तसेच
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील
आढावा जलसंधारण सचिवांनी घेतला याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना विभागाचे आयुक्त
रंगा नायक रोजगार हमी योजना विभागाचे उपायुक्त के.एन.के. राव, उपजिल्हाधिकारी
मनिषा जायभाये, जिल्हा परिषदेचे अप्पर मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, कार्यकारी अभियंता जनबंधू, भूजल सर्वेक्षण
विभागाचे अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जलयुक्त
शिवार अभियानामध्ये नागपूर जिल्हयाने मागील वर्षी 3 हजार 036 कामे सुरु केली होती.
त्यासाठी 93 कोटी रुपयाचा आराखडा तयार करुन योग्य नियोजन केल्यामुळे जलपरिपूर्णता
साध्य करणे सूलभ झाल्याचे सांगतांना जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी यावर्षी सुरु
करण्यात आलेले 3 हजार 514 कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे. मागील
वर्षी 185 गावांची निवड करण्यात आली होती 173 गावे शंभर टक्के जलपरिपूर्ण झाले
असून 12 गावे 82 टक्के पूर्ण झाली आहेत. या कामांचे जिओ टॅगिंग ऑनलाईन
मॉनिटरींगमध्ये सुध्दा 95.57 टक्के काम पूर्ण केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जलयुक्त
शिवार अभियामध्ये यावर्षी 220 गावांमध्ये 3 हजार 863 कामे प्रस्तावित करण्यात आली
असून ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात
येईल. गावातील कोल्हापूरी बंधारे व सिमेंट बंधाऱ्यांचे यापूर्वी झालेल्या कामांचा
आढावा घेवून ज्या बंधाऱ्यामध्ये दुरुस्ती व देखभाल करुन मोठ्याप्रमाणात पाणी साठवू
शकते. अशी कामे नाविण्यपूर्ण योजनेमध्ये घेवून त्यांच्या दुरुस्तीला प्रधान्य
देण्यात यावे अशी सूचना जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी केली.
जिल्हयातील सन
2016-17 यावर्षात 313 गावे जलपरिपूर्णतेसाठी निवडण्यात आली असून त्यापैकी 312
गावांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. मागेल त्याला शेततळे याअंतर्गत 1 हजार 337
कामे पूर्ण झाले असून रोहयोअंतर्गत दोन वर्षात अडीच हजार विहिरी पूर्ण झाले
असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आपल्या प्रस्ताविकात दिली.
गाळमुक्त
धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गावामधील लघुसिंचन तलाव माजी मालगुजारी
तलाव, पाझर तलाव तसेच गाव तलावांना प्राधान्य दिल्यास पाण्याचा संचय वाढविणे सूलभ
होवू शकते यादृष्टीने जिल्हयातील 54 गावातील 58 कामे पूर्ण करण्यात आली. या
कामांमुळे 1 लाख 24 हजार 410 घनमीटर गाळ काढण्यात आला असून त्यापासून 285
शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
यावर्षी 107
लघुसिंचन तलाव, 15 पाझर तलाव व 30 माजी मालगुजारी तलाव अशा 152 तलावातील 28 लाख 64
हजार 420 घनमीटर गाळण्याचे काढण्याचे नियोजन करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता
बी.एल. शहारे यांनी सांगितले.
महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हयात 5 हजार 673 कामे सुरु करण्यात
आले असून 3 हजार 588 कामे पूर्ण झाली आहे. यासाठी 123 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त
झाला होता. मगाराग्रारोहयो अंतर्गत 11 कलमी कार्यक्रमाअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन
विहिर, अमृतकुंड शेततळे, कल्पवृष फळबाग, निर्मलशोच खड्डे तसेच समृध्द ग्रम योजना
आदी 13 हजार 568 कामे पूर्ण झाले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा
जायभाये यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हयातील जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सुरु
असलेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले.
000000000
No comments:
Post a Comment