Friday, 2 February 2018

खाजगी संवर्गातील ऑटो रिक्षा चालकांना सूचना

नागपूर, दि. 2 :  नागपूर जिल्हा ग्रामीण भागातील सर्व ऑटोरिक्षा चालक, मालक यांना विविध अटी व शर्तीच्या अधीन राहून तीन चाकी ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्याचे वाटप सुरु केले आहे. खाजगी संवर्गात नोंदणी केलेल्या ऑटोरिक्षा नवीन परवान्यावर परिवहन संवर्गात नोंदणी करतांना किंवा सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणून परिवहन संवर्गात नोंदणी करतांना खाजगी संवर्गातील नोंदणी केलेल्या परवानाधारकांना अतिरिक्त परवाना शुल्क अदा करावे लागेल. नवीन परवानासाठी खाजगी संवर्गातील नोंदणी झालेल्या ऑटोरिक्षांना 31 मार्च 2018 पर्यंत नोंदणी करता येईल.
खाजगी ऑटो धारकांनी वाहन परिवहन संवर्गात नोंदणी करुन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (ग्रामीण) यांनी केले आहे.
                                                       *****

No comments:

Post a Comment