Friday, 2 February 2018

कौंटूबिक शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा जाहीर

नागपूर, दि. 2 :  अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत माहे फेब्रुवारी 2018 करिता शिधावस्तुचे धान्य उपलब्धतेनुसार वितरण करण्यात येणार आहे.
प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना दोन रुपये प्रमाणे प्रति व्यक्ती 3 किलो गहू, तीन रुपये प्रमाणे 2 किलो तांदूळ, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति पत्रिका दोन रुपये प्रमाणे 15 किलो गहू, तीन रुपये प्रमाणे 20 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकाकरिता 20 रुपये प्रति किलो दराने 1 किलो साखरचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
****

No comments:

Post a Comment