मुंबई,
दि. 5 :सांगली जिल्ह्यातील सातबारा
उतारा व ई-फेरफार ऑनलाईन नोंदणीचे 100 टक्के काम आठ दिवसात पूर्ण
करण्यात येईल,
अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य विजय वडेट्टिवार
यांनी महाभूलेख संकेतस्थळावरील सातबारा उतारा व ई-फेरफारची ऑनलाईन नोंदणी बंद
झाल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री.पाटील म्हणाले, महाभूलेख संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राकडून तयार करण्यात आले
आहे. राज्यातील ठाणे व सांगली या दोन जिल्ह्यातील डाटा स्थलांतराच्या कालावधीत
काही काळ सर्व्हर बंद होते. आतापर्यंत ठाणे जिल्ह्याचे काम 56.46 टक्के एवढे झाले असून सांगली जिल्ह्याचे 67.2 टक्के
काम झाले आहे. येत्या आठ दिवसात सांगली जिल्ह्याचे काम 100 टक्के
केले जाईल असेही श्री.पाटील यांनी सांगितले.
000
No comments:
Post a Comment