Tuesday, 27 March 2018

भीमनगर येथील 345 सभासदांना झोपु योजनेअंतर्गत घरे देणार - रवींद्र वायकर


मुंबई, दि.27 :नायगाव येथील मातोश्री सहकारी गृहनिर्माण संस्था आणि 19 इतर सहकारी गृह निर्माण संस्था या संस्थांचा पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव झोपडपट्टी प्राधिकरणास सादर केला आहे. इमारतींचे काम सुरू असून, मनगर येथील 345 सभासद व कुटूंबियांना घरे देण्यात येतील, असे गृहनिर्माणराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.
यासंदर्भात सदस्य संजय कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सचना मांडली होती.
त्यास उत्तर देताना श्री. वायकर म्हणाले, येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत 4504 लोकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. भमनगर कुटूंबियांसाठी 6 इमारती प्रस्तावित आहेत. यापैकी 3 इमारती झोपडपट्टीधारकांसाठी, एक विक्री आणि पुनर्वसन, 2 इमारती विक्रीसाठी असून त्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्री. वायकर म्हणाले, येथे बगीचा, प्राथमिक शाळा, स्मशानभमी यासाठी भखंड आरक्षीत आहे.पुनर्वसनचे काम पुर्ण झाल्यावर, विक्री होणा-या इमारतीचे काम सुरू असताना सुविधा मिळाव्यात यासाठी विधेयकात बदल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
तसेच, एकत्रित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधील एकूण 2086 झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. इतर झोपडीधारकांचे पुनर्वसन दोन पुनर्वसन इमारतीमध्ये करण्यात येणार असून, त्यामध्ये 1707 सदनिका प्रस्तावित आहे, अशी माहिती श्री. वायकर यांनी दिली.
००००

No comments:

Post a Comment