मुंबई, दि. 27 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचऱ्याची विल्हेवाट
शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज
विधानपरिषदेत सांगितले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी डंपिंग
ग्राऊंडला लागलेली आग व कचऱ्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत
नियम 97 अन्वये सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी
अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना
डॉ.रणजित पाटील म्हणाले, कल्याण
डोंबिवली महानगरपालिकेच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन ठिकाणी जागा
निश्चित केली आहे. यासाठी एकूण 29 कोटी प्राप्त झाले आहेत. या पद्धतींमध्ये 700 मे.टन. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडणार नाही. कचरा
टाकण्याच्या जागेवर अतिक्रमण झाले असल्यास ते काढण्याबाबत महापालिकेला निर्देश
देण्यात येतील. कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये, यासाठी संबंधित महापालिकेकडून
रासायनिक फवारणी नियमितपणे करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment