Tuesday, 27 March 2018

पाच प्रकल्पांना दोन महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता - विजय शिवतारे


मुंबई, दि. 27: वासणी, बोर्डीनाला, राजुरा, गनोजा आणि कलोरा या पाचप्रकल्पांना दोन महिन्यांत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. तसेच याप्रकल्पासंदर्भात दिरंगाई झाली असल्यास त्या बाबत चौकशी करूनसंबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जलसंधारण राज्यमंत्री विजयशिवतारे यांनी आज दिली.
यासंदर्भात सदस्य बच्चु कडू यांनी विधानसभेत लक्षवेधी सचना मांडली होती.
यास उत्तर देताना श्री शिवतारे म्हणाले की, संबंधीत प्रकल्पाचा सुधारित प्रशासकीय मान्यता (सु.प्र.मा.)त्रिदस्यीय समितीने तांत्रिक परिक्षणचे अटीसह शिफारस केली आहे. संबंधीतप्रकल्पास दोन महिन्यात मान्यता देण्यात येईल. बोरगाव पेठ हा संपूर्णभाग खारपाणपट्टीचा असून, ही जमीन धरणाच्या बाजूला ७५ टक्के नसल्यानेपुनर्वसन करण्यात आले नाही. मात्र, शेतक-यांच्या समस्या लक्षात घेऊनसंबंधीत क्षेत्रातील शेतक-यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत सकारात्मकविचार करण्यात येईल.  दोन गावांतील मल्यांकनाबाबतच्या फरकाची चौकशी करूननिर्णय घेण्यात येईल. असेही श्री शिवतारे यांनी सांगितले.
बोर्डी व इतर प्रकल्पास पर्यावरणसंदर्भातील मान्यता राज्य पर्यावरणसमितीकडे एक महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल. वासणी व बोर्डीनाला हेप्रकल्प दोन वर्षात पूर्ण होण्याच्या दृष्टीने बळीराजा जलसंजवनीयोजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
यावेळी चर्चेदरम्यान सदस्य सर्वश्री गणपतराव बुंदिले, सुरेश धानोरकर यांनी सहभाग घेतला होता.
०००

No comments:

Post a Comment