Tuesday, 27 March 2018

निकषाबाहेर परीक्षा केंद्राची निवड होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल - शिक्षण मंत्री विनोद तावडे


मुंबई, दि. 27 : योग्य सोयी-सुविधा नसलेल्या ठिकाणे 10 वी च्या परीक्षेसाठी हेतूपस्सर केंद्राची निवड होत आहे, निकषाबाहेर परीक्षा केंद्राची निवड होत असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
दहावी/बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी नियम 97 अन्वये अल्पकालन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले, या परीक्षांमध्ये कॉपी होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येते. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षक आमदारांनी याबाबत हिंमत दाखविल्यास कॉपीचा प्रश्न राहणार नाही. परीक्षेला एका बाकावर दोन विद्यार्थी बसविणे चुकीचे आहे. असे झाले असल्यास याबाबत चौकशी करण्यात येईल.
या चर्चेत सदस्य तानाजी सावंत यांनी सहभाग घेतला होता.
००००

No comments:

Post a Comment