मुंबई, दि. 27 : वैद्यकीय उपचार करताना महत्वाच्या प्रक्रियेमध्ये वापलेल्या
सामुग्रीचा पुन्हा वापर करुन गरीब माणसाच्या जीवाशी कोणी खेळत असल्यास त्यांच्यावर
कारवाई करण्यात येईल. कोणालाही क्षमा केली जाणार नाही, असे
अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
खासगी रुग्णालयात ॲन्जीओप्लास्टीसारख्या हृदय रोगातील
महत्वाच्या प्रक्रियेमध्ये एकदा वापरलेल्या सामुग्रीचा वापर होत असल्याबाबत सदस्य
जयवंतराव जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर
देताना श्री.येरावार म्हणाले, अन्न
व औषध प्रशासन विभागाने रुग्णालयाची तपासणी करण्याची स्वतंत्र मोहीम हाती घेतली
होती. यामध्ये दोषी आढळलेल्या रुग्णालयांवर 18 (सी) अंतर्गत खटले दाखल करण्यात आले
आहे. न्यायालयातील खटल्यांचा पाठपुरावा सुरु आहे. कुठल्या रुणालयात 10 टक्के कोटा
अंतर्गत किती खाटा उपलब्ध आहेत याबाबत ऑनलाईन माहिती मिळते. रुग्णालयाच्या आवारात
आरोग्य सेवक नेमले आहेत. जी रुग्णालये नियमानुसार गरीब रुग्णांना सेवा देत नसतील
तर अशा रुग्णालयांच्या सवलती काढून घेऊ, असेही श्री.येरावार
यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत सदस्य सर्वश्री जगन्नाथ शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला होता.
००००
No comments:
Post a Comment