Tuesday, 27 March 2018

पद्मश्री डॉ. पानतावणे यांच्या निधनाने साहित्य चळवळीतील वैचारिक व्यासपीठ पोरके झाले - विनोद तावडे



मुंबई, दि.27: ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि अभ्यासक डॉ. पानतावणे यांच्या निधनाने साहित्य चळवळीतील वैचारिक व्यासपीठ पोरके झाली असल्याची भावना मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.
साहित्यिकांची मोठी पिढी निर्माण करणारे डॉ.गंगाधर पानतावणे यांना दलित साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक म्हणून ओळखले जायचे. पण त्याचबरोबर नव्यानेच लिहिणाऱ्यांना अस्मितादर्शमधून लिहिते करुन त्यांना  हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात डॉ.पानतावणे यांचा महत्वाचा सहभाग होता. वैचारिक लेखनाबरोबरच समीक्षेच्या प्रांतातही डॉ.पानतावणे यांनी मुशाफिरी केली होती. 'धम्म चर्चा` `मूल्यवेध', 'मूकनायक', 'विद्रोहाचे पाणी पेटले आहे', 'वादळाचे वंशज', 'दलित वैचारिक वाड्मय', 'किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड', साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती', 'साहित्य शोध आणि संवाद' हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध असून या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेले विचार वाचकांच्या कायम लक्षात राहतील.
पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या डॉ.पानतावणे यांनी अस्मितादर्शच्या माध्यमातन वंचित घटकाबददल लिहिणारे पदमश्री डॉ पानतावणे यांचे काम कायम स्मरणात राहतील, असेही श्री. तावडे यांनी आपलया शोकसंदेशात म्हटले आहे.
००००

No comments:

Post a Comment