Tuesday, 24 April 2018

युवकांची ‘साहसी’ वृत्ती कायद्याच्या अभ्यासक्रमात पोषक - न्यायमूर्ती झेड. ए. हक


* ‘करियर म्हणून कायद्याचा अभ्यास’ विषयावर चर्चासत्र

नागपूरदि. 24 : वकिली क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना प्रत्येक दिवशी  नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागतेत्यामुळे ‘साहसी’ वृत्ती असणे आवश्यक असतेआव्हाने पेलू इच्छिणाऱ्यांनी विधी क्षेत्र करीअर म्हणून निवडले तरच त्यांना यशाची शिखरे गाठता येतीलअसे विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेडहक यांनी व्यक्त केले.
डॉवसंतराव देशपांडे सभागृह येथे करियर म्हणून कायद्याचा अभ्यास’ विषयावर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ व साप्ताहिक युवा करियरच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉविजेंद्र कुमार उपस्थित होतेतसेच सेवानिवृत्त न्यायमूर्ती आरसीचौहानअनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सीएलथूलचंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलीलविद्यापीठाचे कुलसचिव डॉएनएमसाखरकर आदी उपस्थित होते.
मुलांमध्ये लहानपणापासूनच त्यांच्या आवडी-निवडीनुसार करिअर म्हणून कुठल्या क्षेत्राची निवड करणार याबाबत आवड निर्माण केली पाहिजेमुलांचे करिअर घडविण्यामध्ये जितका शिक्षकांइतकाच आई-वडीलांचा मोठा वाटा असतोत्यामुळे मुलांच्या मनासारख्या क्षेत्रात त्यांना पुढे जाण्याची संधी दिली तरच ते यशाचा उंच शिखर गाठू शकतातअसे न्यायमूर्ती झेडहक म्हणाले.
कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावाच लागतोयुवकांना कायदेपंडीत व्हायचे असेल तर मानसिकदृष्ट्या त्यांनी यासाठी तयार असावेविधीचा अभ्यास हा उपजिवीकेसोबतच देशसेवेची संधी देत असतोत्यामुळे सन्मान मिळवून देणाऱ्या क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक बदल घडविण्याची जबाबदारी युवकांनी उचलावीअसे आवाहन सेवानिवृत्त न्यायमूर्ती आरसी.चौहान यांनी केले.
व्यावसायीक क्षेत्रातदेखील कायदे पंडीतांची गरज भासू लागली आहेत्यामुळे  हा पेशा केवळ न्यायालयापुरता मर्यादित नाहीहे क्षेत्र व्यापक होत आहेकार्पोरेट क्षेत्रातही तरुण-तरुणी करिअर करू शकतातअसे सांगतांना न्यायमूर्ती सीएल.थूल म्हणाले कीत्यांना खेळामध्ये आवड होतीपरंतू काही कारणास्तव त्यांना वकिली क्षेत्रात उतरावे लागलेअसे असले तरी देखील न्यायदानाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची संधी ही अभिमानास्पद होतीअसे ते म्हणाले.
 कुलगुरु डॉविजेंद्र कुमारजिल्हाधिकारी आशुतोष सलीलसंपादक मोनाल थूल यांनी चर्चासत्रात समायोचित विचार व्यक्त केलेकार्यक्रमाचे संचालन व आभार आस्था दुबे यांनी मानले.
*****

No comments:

Post a Comment