Tuesday, 24 April 2018

जेएनपीटीकडून सुश्रुषा हॉस्पिटलला एक कोटीचा निधी

मुंबई, दि. 24 : सामाजिक दायित्व निधीमधून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टतर्फे विक्रोळी येथील सुश्रुषा सिटीझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल लि. या संस्थेला एक कोटी निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृह येथे जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, अध्यक्ष नीरज बन्सल, व्यवस्थापक एन.के. कुलकर्णी यांच्याकडून हा धनादेश सुश्रुषा हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. बी.एन.लाड, माजी आमदार मधू चव्हाण यांनी स्वीकारला.
००००

No comments:

Post a Comment