* बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्पांतर्गत स्वयंसेवी संस्थांची बैठक
नागपूर, दि. 24 : बंदीजणांमध्ये सुधारणा व पुनर्वसनात्मक उपाययोजनांतर्गत वाईट मार्गापासून परावृत्त करून जीवनाच्या नवीन वाटचालीस सुरुवात करण्यास स्वयंसेवी संस्थाची मदत सामाजिक बदलास पूरक होत असल्याचे प्रतिपादन पूर्व विभाग, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग व टाटा ट्रस्ट मुंबईच्या ‘बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्पांतर्गत’ नागपूर मध्यवर्ती कारागृहाशी संबंधित शासकीय व अशासकीय संस्थांची बैठक घेण्यात आली.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या उपव्यवस्थापक सोनाली शहा, कारागृह अधीक्षीका राणी भोसले, प्रकल्प समन्वयक धनपाल मेश्राम आदी उपस्थित होते.
कायद्यात झालेल्या सुधारणेमुळे आता बंदींना सरकारी खर्चाने वकील उपलब्ध करून देता येतो. कायदेविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा वातावरणात वावरणाऱ्या बंदीजणांच्या मानसिकतेत बदल होण्यास मदत मिळत असल्याचे उपव्यवस्थापक सोनाली शहा म्हणाल्या.
बैठकीत महिला बंदी व त्यांची बालके याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच स्वयंसेवी संस्थांनी प्रशासकीय यंत्रणेशी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी 1 फेब्रुवारी 2017 ते 1 मार्च 2018 या कालावधीत स्वयंसेवी संस्थाच्या कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनपाल मेश्राम यांनी मांडले. संचालन महादेव डोंगरे तसेच आभार श्रीमती राणी भोसले यांनी मानले.
****
No comments:
Post a Comment