Ø खरीप हंगामपूर्व
नियोजनाचा आढावा
Ø 4 लाख 80 हजार हेक्टर
क्षेत्रावर खरीपचे नियोजन
Ø कापूस, सोयाबिन, तुर
व भात आदी पीकांचे नियोजन
Ø बोंडअळी नुकसान
भरपाईसाठी 11 तालुक्यांचा समावेश
Ø गटशेतीच्या
माध्यमातून दुप्पट उत्पादनाचे लक्ष
नागपूर,
दि. 22 : मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त
करण्यात आला असल्यामुळे शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन उत्पन्न वाढीला
प्रोत्साहन देत असतांनाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते तसेच पीककर्ज
वेळेवर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी
आज दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात नागपूर जिल्हयातील सन 2017-2018 कृषी उत्पादन
कार्यक्रमाचे नियोजनाचा आढावा कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली
आयेाजित बैठकीत घेण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी
पालकमंत्री चंद्रशेबर बावनकुळे, आमदार सुनील केदार, डॉ. आशीष देशमुख, सुधीर पारवे,
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
निशाताई सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्यकार्यपालन
अधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
शेतकऱ्यांना
आधुनिक तंत्रज्ञान तसेच शेतीच्या यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देऊन उन्नत शेती,
समृद्ध शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्यात
विशेष अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगतांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर
म्हणाले की, मागील तीन वर्षात कृषी विकासाला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना उत्पादन
वाढीसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे
नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचे धोरण असून
प्रधानमंत्री कृषी योजनेचा लाभ संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी ही योजना
प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हयातील गारपीटमुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ त्वरित देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
खरीप हंगामाचे
नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात कृषी
सहायक व कृषी तज्ज्ञ बैठक घेऊन शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरीत करुन पीक
पद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरु
केलेला उपक्रम विदर्भातील सर्व जिल्हयात 1 मे ते 30 मे पर्यंत राबविण्याच्या सूचना
करतांना कृषी मंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांना कमी पाण्यात व कमी दिवसात येणाऱ्या
खरीप पीक घेण्यासंदर्भात नियोजन करताना पीक कर्जाचे वाटप जुलै अखेरपर्यंत पूर्ण
करण्याच्या सूचना यावेळी केले.
खरीप हंगामासाठी
शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे व खतांचा पुरवठा होईल या दृष्टीने जिल्हास्तरावर
नियोजन करण्याच्या सूचना करतांना कृषी मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, विविध
निकृष्ट व बोगस बियाणासंदर्भात सतर्क राहून अशा बियाणांची विक्री होणार नाही याची
दक्षता घेतानांच जिल्हा, तालुका तसेच ग्रामस्तरावर भरारी पथके सज्ज ठेऊन ग्रामसभेत
सुद्धा अशा बियाणापासून सतर्क राहण्याचा सूचना प्रत्येक शेतकऱ्यांना यावेळी
केल्यात. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली निकृष्ठ बीटी बियाणे तसेच इतर बियाणे अथवा खरीप
हंगामाबाबत अडचणी असल्यास त्याची माहिती जिल्हास्तरावर तात्काळ दखल घेऊन
सोडविण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हयातील खरीप
हंगामाच्या नियोजनानूसार 86 हजार 204 क्विंटल बियाणाची आवश्यकता असून यामध्ये
सोयाबिन-56 हजार 250 क्विंटल, भात 18 हजार 840 क्विंटल, कापूस 5 हजार 63 क्विंटल,
तूर 3 हजार 120 क्विंटल, भुईमुंग 1 हजार 089 क्विंटल बियांणाचे आवश्यकता असून
त्यानूसार बियाणे उपलब्ध आहेत. तसेच 1 लाख 41 हजार 740 मेट्रिक टन खतांची आवश्यकता
असून आवश्यकतेनूसार खतांचा साठा उपलब्ध
करुन देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.
कमी पाण्यात येणाऱ्या पीकांचे नियोजन
खरीप हंगामात पीकांचे
नियोजन करतांना पेंच प्रकल्पातून मागील वर्षाच्या तुलनते पाणी कमी उपलब्ध होत
असल्यामुळे कमी पाण्यात उत्पादन देणाऱ्या पीका संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करण्याची आवश्यकता व्यक्त करतांना
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पेंच लाभ क्षेत्रातील 1 लक्ष 10
हजार 357 शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी उपलब्ध होत असल्यामुळे 69 हजार हेक्टर
क्षेत्रावर पीकांचे नियोजनाबाबत मार्गदर्शन करुन कमी दिवसात येणाऱ्या पीकाबाबत
माहिती देण्यात यावी. प्रकल्प क्षेत्रात सिंचन पोहोचत नाही अशा 12 हजार 234 हेक्टर
क्षेत्र वगळुण तेथे सिंचन विहिरीसारखे पर्यायी उपाय लागू करण्यासाठी प्रस्ताव सादर
करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आले.
बोंडअळीचा
प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोग प्रतिकारक्षमता चांगली असलेल्या व महाबिज, कृषी
विद्यापीठांनी विकसीत केलेले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच
शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक गावात
नियोजन करण्यात यावे. भिवापुरी मिर्ची, हळद आदी पिकांना प्रोत्साहन देऊन
शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. आदी सूचना लोकप्रतिनिधींना
यावेळी केल्यात.
प्रारंभी
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वागत करुन नागपूर जिल्हयातील खरीप हंगाम
नियोजनाबाबत माहिती दिली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी खरीप
हंगाम, कृषी उत्पादन नियोजनासंदर्भात यावेळी सादरीकरण केले.
असे आहे नियोजन
नागपूर जिल्हयात पीक लागवडीखाली 5 लक्ष 93 हजार
800 हेक्टर क्षेत्र असून त्यापैंकी 91 हजार 900 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.
सर्वसाधारण क्षेत्रापैंकी 4 लाख 80 हजार 756 हेक्टर क्षेत्र खरीप हंगामासाठी तर 1
लाख 64 हजार 572 हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामाखाली आहे. मागील वर्षी सरासरीच्या
तुलनेत 78.91 टक्के पाऊस पडल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
खरीप हंगामामध्ये खरीप भात 94 हजार 200 हेक्टर,
खरीप ज्वारी 8 हजार हेक्टर, तूर 6 हजार 500 हेक्टर, सोयाबिन 1 लाख हेक्टर तर कापूस
22 हजार 500 हेक्टर प्रस्तावित आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबिन व कापसाच्या
क्षेत्रात थोडया प्रमाणात घट आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे महाबिज
कडुन 29 हजार 542 क्विंटल तर खाजगी कंपन्यांनकडून 56 हजार 662 क्विंटल असे एकूण 86
हजार 204 क्विंटल उपलब्ध होणार आहे. रसायनिक खतांचा वापराबाबत नियोजन करण्यात आले
असून 40 हजार मेट्रिक टन संयुक्त खते व 1 लाख 41 हजार 740 मेट्रिक टन रसायनिक
खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. त्यानुसार खतांचा पुरवठा उपलब्ध होणार आहे.
****



No comments:
Post a Comment